॥ श्री गुरुचरित्र ॥

विषयीची माहिती

सिद्धनामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.

‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ गुरुचरित्र’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘श्री गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे

Gurucharitra

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी’ आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे!

‘गुरुचरित्रा’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे. ते हे की, यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच बरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत.

गुरुचरित्रासंदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे आचरण कसे ठेवावे ह्याच्या संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन श्री गुरुचरित्र मधे केलेले आहे.

गुरुचरित्र’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात / घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतात ज्यांचे निराकरण होणे बर्‍याचदा कठीण असते अश्यावेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेऊन प्रार्थना करणे, लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते, आपण फक्त संकल्प स्वरुपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि साप्ताहाचे नियम असतील त्या प्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण.
नियमीत पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध, आंदमयी होते.

श्रीगुरुचरित्रात ग्रंथात वाचन / पारायण तीन प्रकारे करता येईल, असे सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे.
वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे.

  • पहिला प्रकार –
    ‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम। शुद्ध  अंतःकरणाने / भावनेने कधीही पारायण करता येऊ शकते.
  • दुसरा प्रकार –
    ॥ सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथा स्थिती । शूचिर्भूत होवोनी शास्त्ररीती । सप्ताह करीता बहूपुण्य ॥ दिनशुद्धी बरवी पाहून । आवश्यक स्नान संध्यादिक करुन । पुस्तक वाचावयाचे स्थान । रंगविल्याही शोभा करावी ॥ देशकालाही संकल्प करुन । पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन । यथोपचारे करुन । ब्राह्मणासही पूजावे ॥ प्रथमदिवसापासोन । बैसावया असावे एकस्थान । अतत्वार्थ भाषणी धरावे मौन । कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान । देव ब्राह्मण वडिल वंदून पूर्वोत्तर मुख करुन । वाचती प्रारंभ करावा ॥ नव संख्या अध्याय प्रथमदिनी । एकविशती पर्यंत द्वितीयदिनी । एकोनत्रिशंत तृतीयदिनी । चतुर्थीदिनी पंचतीस ॥ अडतीसपर्यंत पांचवेदिन । त्रेचाळीसवरी सहावेदिनी । सप्तमी बावन्न वाचोनी । अवतराणिका वाचावी ॥

    अशी सप्ताहपद्धती ते सांगतात. नंतर उत्तरपूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे, ब्राह्मण सुवासिनीस भोजन-दक्षिणा द्यावी, त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे.
  • तिसरा प्रकार –
    ‘धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध । म्हणजेच लेखनस्वरूपात सेवा करावी.’

    ‘सदा वाचावे गुरुचरित्र’ या ओवीचे दोन अर्थ आहेत. सदाम्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव । दररोज वाचताना एक फायदा होतो.

विस्तृत माहिती साठी इथे बघा.

  • श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. 
  • स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही ह्या बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत.
  • स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री. प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा निष्कर्ष आहे.
  • पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. 
Scroll to Top