घटस्थापना कशी करावी ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती 

पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते.
नवरात्रीच्या काळात अनेक भाविक श्रद्धेने विधिपूर्वक घटस्थापना करून पूजा तसेच ९ दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. 
चला तर जाणून घेऊ नवरात्रामद्धे घटस्थापना कशी करावी ते. 

घटस्थापना कधी करावी?

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व असून नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते.  ह्या काळात अनेक भाविक श्रद्धेने विधिपूर्वक घटस्थापना करून पूजा तसेच ९ दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. शारदीय नवरात्रीची अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला घटस्थापना करून सुरूवात होते त्यानंतर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी पूजा, होम  तसेच कन्यापूजन करून नवरात्रीची सांगता केली जाते. नवमी तिथीला महानवमी, दशमी तिथीला विजयादशमी,  दसरा हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

घटस्थापना – नवरात्रीचा पहिला दिवस

पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी २ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होत आहे, अशा परिस्थितीमुळे उदय तिथीनुसार ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.

घटस्थापना स्थापना शुभ मुहूर्त 

शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना किंवा कलश स्थापनेचे काही मुहूर्त गुरुवार ३ ऑक्टोबर :
शुभ मुहूर्त सकाळी ०६:०७ ते ०९:३० पर्यंत
जर काही कारणास्तव सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल तर
अभिजीत मुहूर्त दुपारी ११:३७ ते १२:२३ पर्यंत
अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

घटस्थापना कशी करावी?

घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी. कलश स्थापना करत असताना चांदीच्या किंवा तांब्याच्या कलशात करावी. नंतर ज्या ठिकाणी घट स्थापन करणार असाल ती जागा गंगाजल शिंपडून  शुद्ध करून घ्यावी, नंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षत, हळद, नाणी, वेलची, सुपारीची पाने व फुले टाकावीत. यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवा. शेवटी, कलश स्थापित करताना, देवी दुर्गा चे नामस्मरण करावे. 

त्यानंतर दररोज स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करून पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करावा, नंतर देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करून मंदिरात तुपाचा दिवा लावून देवीची भक्तिभावाने आरती करावी नंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा. 

नवरात्रीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेनंतर दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. ज्यांना नवरात्रीचे ९ दिवस उपवास करता येत नाहीत, ते पहिल्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीला उपवास करतात. याला नवरात्रीचे आरोह-अवरोह असे म्हटले जाते. महाष्टमीच्या दिवशी कन्यांची पूजा केली जाते आणि महानवमी किंवा दशमीला होम केला जातो, अनेक ठिकाणी दुर्गा अष्टमीच्या दिवशी होम केला जातो, तरी ते नवमी किंवा दशमीला होम करतात आणि दसऱ्याच्या दिवशी पारण करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top