गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प (GuruCharitra Parayan Sankalp) करणे आवश्यक आहे. खाली दिल्याप्रमाणे तयारी ठेवावी.
(सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायण करण्याची परवानगी घेऊन परायणाला सुरुवात करावी. सात दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत ठेवावा. वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा ठेवावा.)
एक चौरंग, बसण्यासाठी पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, (२) सुपारी, विडयाची २ पाने, तूप, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) पाच फळे, अबीर, गुलाल, बुक्का, अगरबत्ती, अगरबत्ती स्टॅंड, दिवा, कापूस, आरतीचे ताट. कापूरारती आणि धूपाटणे, चंदन, पूजेसाठी तांब्याची पळी, पंचपात्र आणि तांबे/पितळेचे दोन ताम्हण, पूजेसाठी पाणी, हात पुसण्यासाठी कापड. २ नाणी, २ अखंड दिप – एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा.
संकल्प प्रारंभ
आचमन:
एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ गोविन्दाय नमः (हातातले पाणी ताम्हणात सोडावे.)
हात जोडून पुढचे मंत्र म्हणा-
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।
पुनः आचमन:
यानंतर पुन्हा एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ गोविन्दाय नमः (हातातले पाणी ताम्हणात सोडावे.)
हात जोडून पुढचे मंत्र म्हणा –
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।
प्राणायाम:
खालील मंत्र म्हणताना अनुलोम-विलोम प्राणायाम करा. (अनुलोम विलोम हे एक विशिष्ट प्रकारचे नियंत्रित श्वासोच्छवासाचा प्राणायामाचा प्रकार आहे. यामध्ये श्वास घेताना एक नाकपुडी बंद ठेवतात थोडावेळ श्वास रोकून ठेऊन श्वास सोडताना दुसरी नाकपुडी बंद ठेवतात.)
प्रणावस्य परब्रह्म ऋषिः। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोगः। ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जन: ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो योन: प्रचोदयात् । ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव स्वरोम ।
देवता वंदन आणि ध्यान:
उजव्या हातात पाणी, फुल, अक्षता घ्या आणि लक्ष्मी, गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा-
ॐ श्रीमन्महागणपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तु देवताभ्यो नमः। श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। मातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः।। अविघ्नमस्तु ।।
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।
धूम्रकेतुर्गणाध्यक्शो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये ।
सर्वमङ्लमाङ्गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनार्दनः ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे
शालिवाहन शके (मराठी वर्ष संख्या)
(मराठी वर्षाचे नाव) नाम संवत्सरे,
(जे आयन सुरू असेल ते) दक्षिणायने \ उत्तरायने,
(सुरू असलेला ऋतु) ऋतौ,
(मराठी महिना) मासे,
(पक्ष) कृष्ण पक्षे \ शुक्ल पक्षे,
(त्या दिवसाची तिथी) तिथौ,
(वार) वासरे,
(त्या वेळेच नक्षत्र) नक्षत्रे,
(योग) योगे,
(करण) करणे,
(चंद्र ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते चन्द्रे,
(सूर्य ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते सूर्ये,
(गुरु ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते देवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ
(ह्याची माहिती कॅलेंडर, कोणत्याही पंचांगात किंवा मोबाइल पंचांग ऐप मध्ये मिळू शकेल)
मम (आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून) आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं सर्वारिष्ट शांतिपूर्वक- सकलमंगलावाप्त्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीगुरुदत्तात्रेयपूजनं च करिष्ये । तथा आसनादिकलशशंखघंटादीप- पूजनं च करिष्ये’ (नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.)
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।
अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलहरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।
धूपदीपनैवेद्यं समर्पयामि ।
(असे म्हणून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)
वरील संकल्प कठीण वाटत असेल किंवा जमात नसेल तर पुढील प्रमाणे सोपा संकल्प करावा
सर्वसाधारण लोकांकरिता सोपा संकल्प
संकल्प :
एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ममः आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं मम मनेप्सित कार्यसिद्ध्यर्थं श्रीपादश्रीवल्लभ -नरसिंहसरस्वती -दत्तात्रेयदेवता -प्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये ।
(असे म्हणून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)
सार्वजनिक कल्याणाकरितां म्हणजे राष्ट्रहिताकरितां करणेचा संकल्प
संकल्प :
एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मिन् भारतवर्षीय जनानां क्षेमस्थैर्य-ऐश्वर्याभिवत्यर्थ धर्म-भिवत्यर्थ-स्वातंत्र्यप्राप्त्यर्थ, स्वातंत्र्यमध्येषु सकलशत्रुविनाशनार्थ, तत् शत्रुसंहारक-तेजोबलवीर्यप्राप्त्यर्थं, सकलभयनिरसनार्थ, अभयसिदार्थ श्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणाख्यं कर्म करिष्ये.
(असे म्हणून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)
ध्यान:
मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे ।
मध्यस्थपाणियुगले डमरू-त्रिशूले ।
यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।
वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ॥१॥
औदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः ।
चिंतामणीः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये ।
कृत जनार्दनो देवस्त्रेत्रायां रघुनन्दनः ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद-श्रीवल्लभः ॥२॥
त्रैमूर्ति राजा गुरु तोचि माझा ।
कृष्णातिरी वास करून वोजा ।
सुभक्त तेथे करिता आनंदा ।
ते सुर स्वर्गी पाहती विनोदा ॥३॥
ध्यानमंत्र:
ब्रह्मानंद्म परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतम् ।
भावातीतं त्रिगुनरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
काषायवस्त्रं करदंदधारिणं ।
कमंडलुं पद्मकरेण शंखम् ॥
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं ।
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
आपले पारायण निर्विघ्नपणे पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
॥ गुरुदेव दत्त ॥