।। श्री गणेशाय नमः ।।

।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।।

अनसूयात्मज हे जगपालका ।
तुजविण न जगी कुणी बालका ।
तरी कथी स्मरु मी कवणा प्रती ।
शरण मी नरसिंह सरस्वती ।।१।।

मग मला गमला पथ हा बरा ।
तव पदीच असो नित्य आसरा ।
पुरती हेतू कधीं मम हे कथीं ।
करी दया नरसिंह सरस्वती ।।२।।

मज कडोनिच घेऊनी चाकरी ।
मग ही देशील योग्य न ते जरी ।
शिशुस मोबदला कुणि मागती ।
कथीं बरे नरसिंह सरस्वती ।। ३।।

नति तुझ्या पदीं अर्पिती किंकर ।
अभय दे शिरी ठेवी गुरु कर ।
स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती ।
करी दया नरसिंह सरस्वती ।। ४।।

मदीय लोचन सार्थक जाहले ।
सगुण सद्-गुरु सतरूप पाहिले ।
बघ मना रुप मंगल हे किती ।
करी दया नरसिंह सरस्वती ।।५।।

तव कृपेविण जीवचि घाबरे ।
अभय दे शिरी ठेवचि हस्त रे ।
तव पथा गुरु वासचि पाहती ।
करी दया नरसिंह सरस्वती ।।६।।

बहुत भोगियल्या गुरु आपदा ।
चुकवि दावी आतां तुझिया पदा ।
द्रुतगती आजि धावचि संकटी ।
करी दया नरसिंह सरस्वती ।।७।।

कितीतरी आळवु तुजला श्रीगुरु ।
बहुत ही श्रमलें भवि लेकरु ।
कशी दया तुजला लव ये न गा ।
अनसूयात्मज भो मज पावगा ।।८।।

तुज समक्ष अरी मज गांजिती ।
लवभरी तुजला कशी ना क्षिती ।
उगीच कां त्रिशुला धरिलें अगा ।
अनसूयात्मज भो मज पावगा ।।९।।

मदीय प्राण हरिलचि काळ तो ।
मग तुझा उपयोगचि काय तो ।
म्हणुनी मी पुसतो कधीं येशि गा ।
अनसूयात्मज भो मज पाव गा ।।१०।।

सदयता हृदयीं लव तु धरी ।
भजनी मंडळी हे गुरु तु उद्धरी ।
स्वकिय, आप्त, रिपु आणि निंदका ।
अनसूयात्मज भो मज पावगा ।। ११।।

अदयता धरिली अशी का बरे ।
भवपुरी बुडतो जिव घाबरे ।
पुरवी हेतु न मी गुरु दास गा ।
अनसूयात्मज भो मज पावगा ।।१२।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top